गुगलचा पहिला स्मार्टफोन लॉन्च; १३ पासून बुकिंग सुरु

google
सॅन फ्रान्सिस्को- आपला पहिला न्यू जनरेशन स्मार्टफोन गुगल ब्रॅंडने बाजारात उतरवला असून गुगल पिक्सल आणि गुगल पिक्सल एक्सएल असे दोन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. येत्या १३ ऑक्टोबरपासून या फोनची बुकिंग भारतात सुरु होईल.

हा फोन फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल आणि क्रोमा स्टोअर्समध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या फोनची किंमत जवळपास ५७ हजार रुपये असेल. गुगल पिक्सल हा इनबिल्ट असिस्टेंट असलेला जगातील पहिला स्मार्टफोन आहे. क्लाउड कॉम्प्युटिंगच्या माध्यमातून युजर्सला अनलिमिटेड डेटा सेव्ह करता येणार आहे. गुगल प्रीमियम हँडसेटमध्ये आयफोन आणि सँमसंगला थेट टक्कर देण्याची शक्यता नाकाराता येत नसल्याचे एक्सपर्ट्‍सनी सां‍गितले आहे.

३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या गुगल पिक्सलची किंमत जवळपास ५७ हजार रुपये तर १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या गुगल पिक्सलची किंमत जवळपास ६६ हजार रुपये असू शकते. ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या पिक्सल एक्सएलची किंमत ६७ हजार रुपये तर १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असलेल्या पिक्सल एक्सएलची किंमत ७६ हजार रुपये आहे. पहिल्यांदा स्मार्टफोनची मॅन्युफॅक्चरिंग गुगलने केली आहे. यापूर्वी गूगलने एचटीसीच्या मदतीने स्मार्टफोन बाजारात आणला होता. कंपनीने भारतात एक वेगळी मार्केट स्ट्रॅटजी बनवली आहे. ती म्हणजे, ३० शहरांमध्ये ५४ सर्व्हिस सेंटर सुरु करण्यात येत आहेत

Leave a Comment