अॅपलच्या ‘सिरी’ला टक्कर देणार गुगल असिस्टेंट !

siri
मुंबई: आपले दोन नवे स्मार्टफोन पिक्सल आणि पिक्सल एक्सएल गुगलने लाँच केले असून आपल्या या दोन्ही स्मार्टफोनबाबत गुगलने अनेक दावे केले आहेत.

गुगलचे सीईओ सुंदर पिचई यांनी सांगितले की, गुगलला मोबाइलमध्ये सुरु असलेल्या बदलांमुळे याचा बराच फायदा होईल आणि स्मार्टफोनमध्ये गुगल मोठी गुंतवणूक करणार आहे. गुगल पिक्सल सीरीजमध्ये अॅपलच्या सिरीला टक्कर देण्यासाठी गुगल असिस्टेंट (आर्टिफिशिय इटेलिजेंस) तयार करण्यात आले आहे. गुगल असिस्टेंटचा वापर करण्यासाठी यूजर्सला होम बजेटवर क्लिक करुन होल्ड करावे लागेल. त्यानंतर “hot word,” ‘jumps into action’ बोलल्यानंतर असिस्टेंट ऑन होईल. याचा डेमो देखील कंपनीने दाखवला आहे.

एखाद्या खास वेळी किंवा जागी काढलेला फोटो तुमच्या कमांडनुसार असिस्टेंट तात्काळ उपलब्ध करुन देईल. याशिवाय तुमच्या आवडीची गाणी तुमच्या आवडीच्या म्युझिक अॅपद्वारे प्ले करेल. तुमच्या कमांडवर तुम्हाला रेस्टॉरंटचे नाव त्याचा रिव्ह्यू आणि त्यासंबंधी सगळी माहिती देईल. तुमच्या व्हॉईस कमांडने हे असिस्टेंट तुमचे रेस्टॉरंट देखील बूक करेल.

दरम्यान, याआधी अॅपल आपल्या स्मार्टफोनमध्ये सिरी देत होते. पण आता गुगलने पहिल्यांदाच आपल्या डिव्हाइसमध्ये गुगल असिस्टेंट दिले आहे. गुगल असिस्टेंट वापरण्यास सोपे असून ते अॅपलच्या सिरीला जोरदार टक्कर देऊ शकते. गुगलचा दावा आहे की, त्यांच्या पिक्सल स्मार्टफोनचा कॅमेरा सर्वात बेस्ट आहे. तसेच यामध्ये फास्ट चार्जिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. गुगलचे म्हणणे आहे की, त्यांचा पिक्सल स्मार्टफोन १५ मिनिट चार्ज केल्यानंतर ७ तासापर्यंत बॅटरी लाइफ देतो. तैवानी स्मार्टफोन कंपनी एचटीसीने गुगल पिक्सल स्मार्टफोन तयार केला आहे. पण गुगलने आपल्या नव्या पिक्सल सीरीजमध्ये मोठा बदल करुन मोबाइल तयार करणाऱ्या कंपनीचे ब्रॅण्डिंग बंद केले आहे.

Leave a Comment