भारतीय अर्थव्यवस्थेवरील जागतिक बँकेचा विश्वास कायम

world-bank
वॉशिंग्टन – जागतिक बँकेने भारतीय अर्थव्यवस्था ही दक्षिण आशियासह जगभरातील वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहणार असल्याचे म्हटले असून भारतीय अर्थव्यवस्थेवरील आपला विश्वास कायम ठेवला आहे. भारताचा जीडीपी विकासदर २०१६मध्ये ७.६ टक्के असेल आणि २०१७ मध्ये हा वाढत ७.७ टक्क्यांवर पोहोचेल असे जागतिक बँकेने म्हटले.

भारतीय अर्थव्यवस्था भारतात यंदा समाधानकारक मान्सून, नवीन करप्रणालीला होणारा प्रारंभ, सरकारी कर्मचा-यांच्या वेतनात भरघोस वाढ, निर्यातीत वितरकांकडून सकारात्मक वाढ, खासगी क्षेत्रातील गुंतवणूकीच्या प्रमाणात वृद्धी झाल्याने वेगात तेजीत राहील, असा विश्वास जागतिक बँकेच्या ‘दक्षिण आशिया आर्थिक केंद्र’ या अहवालात म्हणण्यात आले. देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल. या दोघांमधील दरी कमी होण्यास सरकारी योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील असे अहवालात नमूद करण्यात आले.

Leave a Comment