एका दिवसात फ्लिपकार्टने कमावले १४०० कोटी

flipkart
मुंबई – एका दिवसात तब्बल १४०० कोटी रुपयांची विक्रमी कमाई फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबपोर्टलने केली आहे. सोमवारी १४०० कोटींच्या व्यवहाराची नोंद फ्लिपकार्टने केली आहे. भारतात एका दिवसात एखाद्या वेबपोर्टलवर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवसाय होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे बोलले जात असून फ्लिपकार्टने नवरात्र, दसरा आणि दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर ‘बिग बिलीयन डेज’ अशी टॅगलाइन देऊन विविध वस्तूंवर आकर्षक आणि ग्राहकांच्या खिशाला परवडतील, असा सेल सुरू केला आहे.

इलेक्ट्रॉनिक्स, कपडे, ज्वेलरीसारख्या निरनिराळ्या वस्तूंवर या बंपर सेलमध्ये मोठी सूट मिळत आहे. सणांच्या पार्श्वभूीवर ऑनलाइन शॉपिंग ट्रेंडमध्ये अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील यांनी बंपर मेगा फेस्टिव्हल सेल ग्राहकांसाठी आयोजित केला आहे. मात्र यात फ्लिपकार्टने एका दिवसात तब्बल १४०० कोटींची कमाई करत बाजी मारली आहे.

Leave a Comment