आयडिया देणार फक्त ५१ रूपयांत १ जीबी डेटा

idea
मुंबई: मोबाईल सेवा देणाऱ्या मातब्बर कंपन्या रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी जंग जंग पछाडत असून त्यासाठी त्यांनी एकापेक्षा एक ऑफर देऊन ग्राहकांना आपल्या कडे वळविण्याचा प्रयत्न आहे. याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून, आपल्या ग्राहकांसाठी एक धमाकेदार ऑफर आयडियाने लॉंच केली आहे. या ऑफरनुसार आयडिया ग्राहकाला केवळ ५१ रूपयांमध्ये चक्क १ जीबी ४जी डेटा देणार आहे. दरम्यान, एअरटेलनेही यापूर्वी अशा प्रकारची ऑफर दिली होती. ज्यात १४९८ रूपयांमध्य ही ऑफर उपलब्ध होती.

आयडियाने दिलेल्या ऑफर प्लाननुसार, हा प्लान सर्व ४जी आणि ३जी ग्राहकांसाठी काम करेल. त्यासाठी ग्राहकाला पहिल्यांदा १४९९चे रिचार्ज करावे लागेल. या रिचार्जची वैधता १ वर्षांची असेल. १४९९ च्या रिचार्जवर ग्राहकांना २८ दिवसांसाठी ६ जीबी ४जी/३जी डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर यूजर्सला पूढच्या १२ महिन्यांसाठी फक्त ५१ रूपयांमध्ये १जीबी ३जी/४जी डेटा मिळवता येईल. दरम्यान, ग्राहकाला जर ५१ रूपयांपेक्षा अधिक किंमतीचा रिचार्ज करायचा असेल तर, त्यासाठी कोणतेही बंधन असणार नाही. तसेच, ५१ रूपयांत १ जीबी डेटा घेण्यात ग्राहकाला कोणतेही लिमीट असणार नाही. म्हणजेच ग्राहक ५१ रूपये प्रति जीबी यानुसार दिवसात दिवसभरात कितीही वेळा रिचार्ज करून १ जीबी डेटा घेऊ शकतो.

यासोबतच आयडियाचे इतरही दोन प्लान आहेत. ते प्लान ४९९ आणि ७४९ रूपयांचे असून, या प्लानची वैधता ६ महिन्यांची आहे. मात्र, यात ५१ रूपयांमध्ये १जीबी ४जी डेटा मिळणार नाही. ४९९ रूपयांवाल्या प्लानमध्ये २८ दिवसांची वैधताअसू,न २ जीबी ४जी/३जी डेटा मिळेल. तसेच, ७४९ रूपयांमध्ये २८ दिवसांसाठी ३जीबी ३ज/४जी डेटाही मिळेल. याशीवाय ४९९वाल्या प्लानमध्ये १२५ रूपयांमध्ये १ जीबी, तसेच ७४९ रूपयांच्या प्लानमध्ये १०१ रूपयांमध्ये १ जीबी इंटरनेट डेटा उपलब्ध असेल. या ऑफरच्या माध्यमातून ६ महिन्यांपर्यंत कितीही वेळा तुम्ही तुमचा डेटा रिचार्ज करू शकता.

Leave a Comment