अवघ्या ८८८ रुपयांत करा विमान प्रवास

spicejet
नवी दिल्ली – स्पाईसजेट या हवाई सेवा कंपनीने सणोत्सवाच्या कालावधीत एकेरी मार्गावर केवळ ८८८ रुपयांत प्रवास करण्याची संधी ग्राहकांना दिली असून ३६९९ रुपयांत आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेवेचा लाभ घेता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना ७ ऑक्टोबर २०१६पर्यंत तिकिटाची नोंदणी करावी लागेल. ८ नोव्हेंबर २०१६ ते १३ एप्रिल २०१७ दरम्यान प्रवास करता येईल. तिकिट नोंद करण्यासाठी कंपनीची अधिकृत वेबसाईट, ऑनलाईन ट्रव्हल पोर्टल, स्पाईसजेटचे मोबाईल ऍप आणि ट्रव्हल एजन्टच्या माध्यमातून करता येईल. बेंगळूर-कोचीन, दिल्ली-देहराडून, चेन्नई-बेंगळूर मार्गावर ८८८ रुपयात, तर चेन्नई-कोलंबो मार्गावर ३६९९ रुपयांत प्रवास करता येईल. प्रथम नोंदणी करणा-या प्राधान्य देण्यात येईल.

Leave a Comment