स्नॅपचॅटसारखे नवे फीचर व्हॉटसअॅपवर उपलब्ध

whatsapp
नवी दिल्ली: आपले नवे फीचर प्रसिद्ध मेसिजिंग अॅप व्हॉटसअॅपने अॅड केले आहे. या नव्या फीचरमुळे आता व्हॉटसअॅपवरुन फोटो आणि व्हिडिओ पाठवताना त्यामध्ये टेक्स्टही वापरता येणार आहे. स्नॅपचॅटप्रमाणेच व्हॉटसअॅपचे हे नवे फीचर आहे. व्हॉटसअॅपचे हे नवे फीचर अॅड्राइडवरच उपलब्ध असून लवकरच iOS वरही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

याबाबत व्हॉटसअॅपने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या फीचरमुळे व्हॉटसअॅपच्या कोणताही फोटो किंवा व्हिडिओ शेअर करताना, त्यावर टेक्ट किंवा स्माईलीही वापरता येणार आहे. विशेष म्हणजे, स्मार्टफोनमध्ये पहिल्यापासूनच असलेल्या फोटोंनाही टेक्स्ट किंवा स्माईली देता येणार आहे. याशिवाय व्हॉटसअॅपने व्हिडिओ बनवताना त्यात झूम इनचाही पर्याय दिला आहे. व्हॉटसअॅपची मालकी असलेल्या फेसबुकनेही ऑगस्टमध्ये इंस्टाग्रामवर स्नॅपचॅटशी मिळते-जुळते ‘माय स्टोरी’ हे नवे फीचर उपलब्ध करुन दिले होते.

Leave a Comment