रिझर्व बँकेने रेपो दरात केली २५ अंकांची घट

rbi
नवी दिल्ली: रिझर्व बँकेने आपल्या तिमाही धोरणात रेपो दरात २५ अंकांची घट केली असून त्यामुळे रेपो दर ६.५ टक्क्यांवरून ६.२५ टक्क्यांवर आला आहे. हा दर सहा वर्षापूर्वीच्या रेपो दराएवढा आहे.

रिझर्व बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या कारकिर्दीतील हे पहिलेच धोरण आहे. याशिवाय सहा जणांच्या धोरण निश्चिती समितीने घेतलेला हा पहिलाच धोरणात्मक निर्णय आहे. यापूर्वी धोरण निश्चितीची जबाबदारी केवळ गव्हर्नर यांच्यावर होती. रेपो दरात घट करण्याचा निर्णय सहा समिती सदस्यांनी एकमताने घेतला.

या निर्णयाचे परिणाम म्हणून कर्जाच्या व्याजदरातही घट होणार असून कर्जाचा हप्ताही कमी होणार आहे. रेपो दर कमी करण्याच्या निर्णयामुळे शेअर बाजारातही उत्साहाचे वारे संचारले. या निर्णयानंतर सेन्सेक्सने ९१ अंकांनी उसळी घेतली. निफ्टी ८ हजार ७५० वर बंद झाला. या निर्णयामुळे बाजारात खेळत्या भांडवलात अध होऊन बाजारात चैतन्य निर्माण होईल; असा विश्वास अर्थ सचिव अशोक लवासा यांनी व्यक्त केला.

Leave a Comment