म्यानमारमध्ये ५३ वर्षांनंतर एसबीआय शाखा सुरू

sbi
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी स्टेट बँक ऑफ इंडियाने म्यानमारची राजधानी यंगून येथे आपली शाखा सुरू केली असून म्यानमार येथे कारभार करणारी स्टेट बँक ही भारतातली पहिली बँक आहे. या ऐतिहासिक घटनेच्या प्रसंगी स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य तसेच सेंट्रल बँक ऑफ म्यानमारचे उपगव्हर्नर क्हीन सॉ ऊ हे उपस्थित होते. म्यानमार मध्ये आपला कारभार सुरू केल्यामुळे स्टेट बँकेची व्याप्ती जगभरातील ३७ देशांत झाली आहे. विदेशात या बँकेच्या ५४ शाखा व १९८ कार्यालये आहेत.

या वेळी बोलताना अध्यक्षा अरूंधती भट्टाचार्य म्हणाल्या, स्टेट बँकेची शाखा म्यानमारमध्ये सुरू करून दोन्ही देशांतील परस्पर संबंधांना वेगळे परिमाण मिळाले आहे. १८६१ मध्ये बँक ऑफ बंगालची शाखा म्यानमारमध्ये होती मात्र देशाच्या बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याच्या योजनेत ही बँक फेब्रुवारी १९६३ मध्ये पिपल्स बँक ऑफ बर्मा मध्ये विलीन करण्यात आली होती. त्या काळापासून असलेले दोन्ही देशांचे नाते स्टेट बँकेच्या शाखेमुळे पुन्हा जोडले गेले आहे.

Leave a Comment