पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ

petrol
नवी दिल्ली : एका आठवड्याच्या आतच दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने वाहनचालक नाराज होण्याची शक्यता असून १४ पैशांनी पेट्रोलच्या किमतीत तर डिझेलच्या किमतीत १० पैशांनी वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ डिलर्सच्या कमिशनमध्ये वाढ झाल्यामुळे केल्याची माहिती आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वीच पेट्रोलच्या किमतीत वाढ झाली होती, तर डिझेल स्वस्त झाले होते. मागील दोन महिन्यात चौथ्यांदा पेट्रोलच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पेट्रोल २८ पैशांनी महागले होते, तर डिझेल सहा पैशांनी स्वस्त झाले होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किंमती लक्षात घेऊन तेल कंपन्यानी तेव्हा हा निर्णय घेतला होता.

Leave a Comment