मलेशियात भरणार ७४ देशांतील दुर्मिळ चलनाचे प्रदर्शन

currancy
पीलीभीत – ७४ देशांतील दुर्मिळ आणि प्राचीन नाण्यांचा संग्रह उत्तर प्रदेशातील पुरनपूर तालुक्यातील मोहम्मद उमर या व्यावसायिकाने केला असून वेगवेगळ्या देशांतील ७८६ या नंबरच्या नोटा उमरकडे आहेत. त्याबरोबरच मुघलकाळातील हजारो नाणी सुद्धा त्यांच्या संग्रहात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे उमरच्या मोबाईलपासून गाडी, टेलीफोन, लाईट कनेक्शन, आरोग्य तपासणी कार्ड, बँक खाते या सगळ्या नंबरचे शेवटचे अंक ७८६ आहेत.

त्यांना आपल्या संग्रहातील नोटा आणि नाण्यांचे प्रदर्शन भरवण्यासाठी दुर्मिळ चलनाचा संग्रह करणाऱ्या एका परदेशी ग्रुपने मलेशियात आमंत्रित केले आहे. आतापर्यंत चीन, भूटान, थायलंडमध्ये त्यांनी आपल्या संग्रहाचे प्रदर्शन भरवले आहे. आपल्या नावाची गिनीज बुक आफॅ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे त्यांचे स्वप्न आहे.

मागच्या ३५ वर्षांपासून उमर हा संग्रह करत आहेत. त्यांच्याकडे नेपाळ, थायलंड, अमेरिका, दक्षिण अमेरिका, जपान, ओमान, पाकिस्तान, इराण, इराक, सौदी अरेबिया, इंडोनेशिया यासोबतच ७४ देशांतील प्राचीन आणि दुर्मिळ नाणी व नोटा आहेत. मुघलकाळातील १०२२ नाणी त्यांच्या संग्रही आहेत. त्यांनी आपल्या घरातील खोलीला या नाण्यांनी सजवले आहे. दूरदूरवरुन लोक त्यांचा हा संग्रह पाहण्यासाठी येत असतात. त्यांच्या या संग्रहामध्ये इराणच्या एक लाख पंन्नास हजारांच्या नोटेचाही समावेश आहे. उमर यांच्या या संग्रहातील विशेष बाब म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या विविध देशांतील जास्तीत जास्त नोटांचे नंबर ७८६ च्या सिरीजमधील आहेत. नोटा आणि नाणी गोळा करण्यासाठी ते अधुनमधून परदेशात जात असतात.

Leave a Comment