पीएफ गहाण ठेवून करा गृह स्वप्नपुर्ती

epfo
नवी दिल्ली – नोकरदारांना पुढील आर्थिक वर्षापासून स्वस्त किमतीत गृह खरेदी करण्यासाठी आणि त्याचे हफ्ते भरण्यासाठी आपला भविष्यनिधी निर्वाह (ईपीएफ) गहाण ठेवता येणार असून सध्या देशातील कर्मचा-यांच्या आर्थिक मदतीसाठी असणा-या या संघटनेचे ४ कोटी सदस्य आहेत. संघटनेच्या सदस्यांसाठी ही योजना सुरू करण्यासाठी आपण कार्यरत आहोत. मार्च अखेरीस ऑनलाईन रक्कम काढण्याची सेवा सुरू करण्यात आल्यानंतर गृह कर्जाच्या योजनेचा प्रारंभ करण्यात येईल, असे ईपीएफओ केंद्रीय आयुक्त व्ही. पी. जॉय यांनी सांगितले.

स्वस्त किमतील घरे भविष्यनिधी निर्वाह खात्याच्या आधारे घेण्यास मदत होईल. या खात्याच्या आधारे सदस्यांना घर खरेदी करण्यासाठी आणि हफ्ते भरण्यासाठी वापर करता येईल. यादरम्यान सदस्यांच्या नोकरीच्या कालावधीत संघटना मध्यस्ताची भूमिका पार पाडणार आहे. यामुळे कर्ज असतानाही सदस्यांना नोकरी बदलणे सोपे जाईल. आपल्या सदस्यांसाठी जमीन खरेदी करणे तथा घरे बांधणे यासंदर्भात संघटना कोणताही विचार करत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संघटनेचे अनेक सदस्य आयुष्यभर मेहनत करतात, मात्र त्यांना स्वतःच्या हक्काचे घर खरेदी करणे जमत नाही. अशा कमी उत्पन्न असणा-या सदस्यांना घर घेण्यासाठी संघटनेकडून मदत करण्यात यावी असे नियुक्त करण्यात आलेल्या समितीने म्हटले होते. कर्जाचे हफ्ते देण्यासाठी सदस्य, बँक अथवा गृहसंस्था आणि ईपीएफओ यांच्यात एक करार होईल. सीबीटीच्या १६ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत सदस्यांना घर देण्यासाठी योजना सुरू करण्याचा प्रस्ताव अजेंडय़ावर होता. या प्रस्ताव बिनविरोध संमत करण्यात आला.

Leave a Comment