कस्टम विभागात चीनची १० रोबोंची तैनाती

roboo
चीनच्या दक्षिण गुआंतोग प्रांतातील ३ बंदरात सीमा शुल्क अधिकार्‍यांची जागा १० बुद्धीमान रोबोंनी घेतली आहे. चीनने तैनात केलेले हे रोबो २८ भाषा जाणतात तसेच चेहर्‍यावरून संशयितांसंदर्भातील आवश्यक सूचनाही कस्टम विभागाला देऊ शकतात असे समजते. पहिल्या टप्प्यात त्यांचा वापर गोंगबेई, झुहाई व हेंगफीन झांगशान बंदरांवर केला जात आहे. यापूर्वी हे रोबो एका विमानतळावर सुरक्षेसाठी वापरले गेले होते.

हे रोबो संशयित व्यक्तीना ओळखून त्या संदर्भातल्या सूचना अधिकार्‍यांना देऊ शकतात. शिआओ नावाचे हे रोबो आधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. ते बोलणे, चालणे, ऐकणे, शिकणे, पाहणे अशा सार्‍या कृती करू शकतात. त्यांच्यासाठी विशेष सुरक्षा बेस दिला गेला असून त्यातून ते कँटोनीज, मँडरीन, इंग्रजी, जपानीसह विविध २८ भाषेतील प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. अर्थात काही समस्या ते हाताळू शकत नाहीत. तरीही भविष्यातील हॉटलाईन सेवेशी ते जोडले जाणार आहेत. चेहर्‍यावरून ते व्यक्ती ओळखू शकतात.

Leave a Comment