देशातली पहिली इलेक्ट्रीक बाईक टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध

tork-bike
पुण्यातील मोटरबाईक निर्माते व टॉर्क कंपनीचे सहसंस्थापक कपिल शेळके यांनी देशातली पहिली इलेक्ट्रीक बाईक टी सिक्स एक्स टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगतानाच ही बाईक कोणतेही आगावू पैसे न भरता बुक करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाईकची किंमत १.२५,९९९ रूपये आहे व तिची डिलिव्हरी मिळण्यासाठी पुढच्या वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

भारत सरकांरच्या फेम (फास्टर अॅडॉप्शन अॅन्ड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हायब्रिड इलेक्ट्रीक व्हेईकल) कार्यक्रमांतर्गत या बाईकचे उत्पादन केले गेले आहे. त्यामुळे या बाईकसाठी अनेक सवलती मिळाल्या आहेत. या बाईकची ६ केव्ही इलेक्ट्रीक मोटर २०० सीसी इतकी पॉवर देते. ऑटोट्रान्समिशनसह असलेल्या या बाईकला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क, रिअर मोनोशॉक सस्पेन्शन सेटअप तसेच जीपीएसची सुविधा दिली गेली आहे. सध्या ही बाईक शोकेसमध्ये अहे. बाईकची डिलिव्हरी सुरू करण्यापूर्वी देशातील प्रत्येक शहरात किमान १०० चार्जिंग सेंटर सुरू केली जाणार असल्याचेही शेळके यांनी सांगितले. दिल्ली, पुणे व बंगलोर शहरात बाईकचे प्रमोशन केले जात असून पहिल्या वर्षात किमान १० हजार बाईक विक्रीचे ध्येय ठेवले गेले असल्याचेही शेळके यांनी सांगितले.

Leave a Comment