…तर एड्स राहणार नाही असाध्य रोग

hiv
लंडन: ब्रिटीश वैज्ञानिक आणि वैद्यकीय तज्ज्ञांनी शरिरात लपून राहणाऱ्या ‘एचआयव्ही’च्या जीवाणूंना शोधून त्यांना नष्ट करणारी उपचारापाद्धातीविकासित केली असून त्याच्या अंतिम परीक्षणाचे निष्कर्ष सकारात्मक आल्यास ‘एड्स’ हा जीवघेणा रोग आता असाध्य राहणार नाही.

ऑक्सफर्ड, केंब्रिज, इंपीरियल कॉलेज, युनिव्हर्सिटी कॉलेज आणि किंग्ज कॉलेज या पाच प्रमुख विद्यापीठातील संशोधक आणि डॉक्टर्स यांनी ‘एचआयव्ही’ नष्ट करणारी उपचार पद्धती विकसित केली आहे. या उपचारांचा प्रयोग ५० रुग्णांवर करण्यात येणार असून त्यापैकी एक रुग्ण ‘एचआयव्ही’मुक्त होण्याच्या मार्गावर आहे. लवकरच घेण्यात येणारी पुढील चाचणी यशस्वी ठरल्यास तो ‘एड्स’पासून मुक्त होणारा जगातील पहिला रुग्ण ठरणार आहे.

‘एड्स’ या दुर्धर रोगाला कारणीभूत ठरणारे ‘एचआयव्ही’चे जीवाणू मानवी शरीरात लपून बसतात. दीर्घ काळ ते सुप्तावस्थेत राहू शकतात. त्यामुळे त्यांना शोधून काढून नष्ट करणारी औषधे बनविण्यात जगभरातील तज्ज्ञांना यश आले नव्हते. मात्र आपल्या संशोधनाने एड्सवरील उपचारांचा मोठा टप्पा गाठल्याचा दावा या संशोधनात सहभागी असलेले मार्क सॅम्युअल यांनी केला.

या उपचारपद्धतीने लपलेल्या ‘एचआयव्ही’ना शोधून त्यांना नष्ट करता येते हे सिद्ध झाले आहे. मात्र ते कायमस्वरूपी नष्ट झाले की नाही; याची खात्री पटविण्यासाठी आणखी काही काळ निरीक्ष करावे लागेल. त्यानंतरच ही उपचार पद्धती यशस्वी झाल्याचे म्हणता येईल; असे त्यांनी नमूद केले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment