आयबॉलचा ‘अँडी विंक ४जी’ लॉन्च

iball
मुंबई : ‘अँडी विंक ४जी’ हा स्मार्टफोन आयबॉल या होम इलेक्ट्रॉनिक्स कंपनीने लॉन्च केला असून आयबॉल अँडी विंक ४ जी स्मार्टफोनची किंमत ५ हजार ९९९ रुपये आहे. रिटेल स्टोअर्समधून हा स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे. आयबॉल अँड विंक ४जी मध्ये ५ इंचाचा FWVGA (८५४ x४८० पिक्सेल) डिस्प्ले असून, १ गीगाहर्ट्झ क्वाड-कोर प्रोसेसर आहे आणि २ जीबी रॅम आहे. इनबिल्ट स्टोरेज १६ जीबी असून, ३२ जीबीपर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या सहय्याने स्टोरेज वाढवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. हा ड्युअल सिम स्मार्टफोन अँड्रॉईड ६.० मार्शमॅलोवर चालणारा आहे. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सेलचा एलईडी फ्लॅशसोबत रिअर कॅमेरा, तर २ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. २३०० एमएएच क्षमतेची बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे. ४ जी व्हीओएलटीई सपोर्ट असणारा या स्मार्टफोनमध्ये जिओ सिम वापरणेही शक्य होणार आहे. कनेक्टिव्हिटी फीचर्समध्ये ३.५ एमएम ऑडीओ जॅक, एफएम रेडीओ, वायफाय ८०२.११ बी/जी/एन, ब्लूटूथ ४.० आणि जीपीएस यांचा समावेश आहे.

Leave a Comment