लेनोव्होच्या ‘झे२ प्लस’वर १२ हजाराची घसघशीत सूट

lenovo
मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी ‘लेनोव्हो’ने दसरा-दिवाळीच्या निमित्ताने ‘झेड२ प्लस’ स्मार्टफोनवर घसघशीत सूट जाहीर केली आहे. लेनोव्होची ऑफर अमेझॉन इंडियाच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’दरम्यान उपलब्ध असेल.

लेनोव्होच्या ‘झेड२ प्लस’वर १२ हजार रुपयांची सूट मिळणार आहे. अॅपद्वारे खरेदी केल्यास या ऑफरचा लाभ घेता येणार असून, जुना स्मार्टफोन एक्सचेंजही करावा लागणार आहे. या स्मार्टफोनच्या ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असणा-या मॉडेलची किंमत १७ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे, तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज असणा-या मॉडेलची किंमत १९ हजार ९९९ रुपयांना मिळणार आहे. शिवाय, शून्य टक्के व्याजाने ईएमआयवरही हा स्मार्टफोन खरेदी करु शकता.

Leave a Comment