खाद्यटपरीधारकांकडून ५० कोटींची रोकड जाहीर

eateries
मुंबई व आसपासच्या भागातील खाद्यपदार्थांच्या टपर्‍या चालविणार्‍यांकडून गुरूवारी रात्रीपर्यंत ५० कोटींची रोकड व अन्य मालमत्ता सरकारच्या इनकम डिक्लेरेशन स्कीम खाली जाहीर करण्यात आल्याचे आयकर विभागातील सूत्रांकडून समजते. आयकर विभागाने गेल्या आठवड्यात देशातील अनेक इटरीज म्हणजे खाद्यपदार्थ विकणार्‍या टपर्‍यांवर धाडी घातल्या होता. त्यात त्यात मुंबईतील अनेक ठिकाणांचा समावेश होता. मुंबईत घालण्यात आलेल्या २०० ठिकाणांत ठाण्यातील वडापाव सेंटर, घाटकोपर येथील डोसा सेंटर, अंधेरीतील सँडविच सेंटर तसेच द.मुंबईतील जिलेबी सेंटरचा समावेश होता.

तज्ञांच्या अंदाजानुसार जाहीर केल्या गेलेल्या ५० कोटी रोकड व अन्य मालमत्तांवर संबंधितांना २२.५ कोटी रूपये कर म्हणून भरावे लागतील. अंधेरीतील ज्यूस सेंटर मालकाने ५ कोटींची कॅश व अन्य मालमत्ता जाहीर केली आहे तर अन्य लोकांनी २५ लाखांपासून २ कोटी रूपयाची कॅश व मालमत्ता जाहीर केली आहे. गुरूवार सायंकाळपर्यंत अशा प्रकारे देशभरात ४० हजार कोटींची मालमत्ता व रोख जाहीर केली गेली आहे. ३० सप्टेंबर हा अशी लपविलेली संपत्ती जाहीर करण्याचा अखेरचा दिवस होता.

Leave a Comment