अरुंधती भट्टाचार्यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढला

arundhati-bhattacharya
नवी दिल्ली: स्टेट बँके ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांना आणखी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून भट्टाचार्य यांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्याच्या सहा तारखेला संपणार होता. परंतु आता ऑक्टोबर २०१७पर्यंत भट्टाचार्य यांच्याकडे स्टेट बँकेचे अध्यक्षपद कायम राहणार आहे.

सध्या पाच सहयोगी बँकांसह महिला बॅंकेचे मुख्य स्टेट बॅंकेत विलीनीकरण केले जाणार असल्यामुळे कार्यकाळ वाढविण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. केंद्रीय मंत्रिमंडळाने पाच सहयोगी बँकांसह महिला बॅंकेचे मुख्य स्टेट बॅंकेत विलीनीकरण करण्यास मंजुरी दिली आहे. मुख्य स्टेट बॅंकेमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाळा, स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.

Leave a Comment