विज्ञानालाही कोडे न सुटलेले सिमसा माता मंदिर

simsa
आज नवरात्रीची घटस्थापना होत आहे. देशभरात देवीची अनेक मंदिरे आज भाविकांच्या गर्दीने फुलून जातील. त्यातीलच एक म्हणजे सिमसा माता मंदिर. ज्या महिलांना अपत्य नाही त्यांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी संतान दात्री नावानेही ओळखली जाते. नवरात्राच्या काळात अपत्यहीन जोडपी येथे दर्शनासाठी येतात व महिला देवीच्या मंदिरात फरशीवर झोपून राहतात व त्यांना अपत्यप्राप्ती होते असे सांगितले जाते.

हिमाचल राज्याच्या मंडी जिल्ह्यात सिमस गावात हे मंदिर आहे. या मंदिराचे कोडे वैज्ञानिकांनाही उलगडता आलेले नाही. नवरात्रात या मंदिरात पंजाब, हरियाना, चंदीगढ व देशातील अनेक लांबच्या ठिकाणांहून संतान प्राप्ती व्हावी या उद्देशाने येथे जोडपी येत असतात. नवरात्रीत येथे सलिंदरा उत्सव साजरा केला जातो. सलिंदराचा अर्थ स्वप्न पडणे असा आहे.

simsa-mata-mandir
असे सांगितले जाते की अपत्यप्राप्तीसाठी महिला तशी मनोकामना करून रात्रंदिवस मंदिरातील फरशीवर झोपून राहतात. त्यानंतर त्यांना प्रतीक रूपात मातेचे दर्शन घडते व अपत्यासाठी आशीर्वाद मिळतो. असे सांगतात की पेरू अथवा तसेच एखादे फळ स्वप्नात दिसले तर मुलगा होतो, भेंडी दिसली तर मुलगी होते व धातू, लाकूड, दगडाच्या वस्तू दिसल्या तर त्या महिलांना अपत्य होणार नाही असा संदेश असतो. तरीही या महिला मंदिरात राहिल्या तर अंगावर लाल चट्टे येऊन अंगाची आग होते असेही सांगतात.

Leave a Comment