यंदा दिवाळीत २५ हजार कोटींची ऑनलाईन खरेदी शक्य

discont
दिवाळीच्या तोंडावर बहुतेक सर्वच ऑनलाईन कंपन्यांनी बंपर डिस्काऊंट देण्याची तयारी सुरू केली असल्याने यंदा ग्राहक या फेस्टीव्ह सीझनमध्ये अंदाजे २५ हजार कोटींची ऑनलाईन खरेदी करतील असा अंदाज असोचेमने व्यक्त केला आहे. गतवर्षी याच काळात २० हजार कोटींची खरेदी केली गेली होती.यंदा अप्लायन्सेस, कॉस्मेटिक्स, ज्युलरी, परफ्यूम्स, शूज, इलेक्ट्रीक वस्तू अशा अनेक गोष्टींवर डिस्काऊंट दिले जात आहेत.

असोचेमचे महासचिव डी.एस. रावत म्हणाले, यंदाचा फेस्टीव्ह सीझन हा कंपन्यांसाठी सर्वात बिझी सीझन असेल असे संकेत मिळत आहेत. या संदर्भात कंपनीने २५०० वर्किंग प्रोफेशनल्सचा सँपल सर्व्हे केला. तेव्हा त्यातील ६० टक्के लोकांनी ते ऑनलाईन खरेदीला प्राधान्य देतात असे सांगितले. यामागे दुकानात लागणार्‍या लांबच लांब रांगा टाळण्याबरोबरच ऑनलाईनचा चांगला पर्याय असल्याचे दिसून आले. शिवाय यात सोपी खरेदी, डिलिव्हरीचे अनेक पर्याय, पेमेंड मोडसाठी अनेक ऑप्शन्स, तसेच विविधता व चांगल्या ऑफर्स आणि बंपर डिस्काऊंट यामुळेही ऑनलाईन खरेदीला पसंती दिली जात असल्याचेही दिसून आले.