एचटीसीने त्यांचा डिझायर १० लाईफस्टाईल हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. ई कॉमर्स कंपनी अमेझॉन तसेच कंपनीच्या स्टोअरमध्ये तो १५९९० रूपयांना उपलब्ध आहे. कंपनीने भारतात या फोनचे ड्युअल सिम व्हेरिएंट सादर केले आहे.
एचटीसीचा डिझायर १० लाईफस्टाईल स्मार्टफोन सादर
या फोनसाठी ५.५ इंचाचा एचडी स्क्रीन गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन सह दिला गेला आहे. ३ जीबी रॅम, ३२ जीबी इंटरनल मेमरी ती २ टीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा, अँड्राईड मार्शमेलो ६.० ओएस, १३ एमपीचा एफ/ २.२ अॅपर्चर, एचडीआर मोड, पॅनोरमा मोड व अन्य फिचर्ससह ऑटोफोकस रियर कॅमेरा, एफ/२.८ अॅपसह ५एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. हा फोर जी फोन आहे मात्र थ्रीजी नेटवर्कवर २४ तासाचा टॉकटाईम व २८ तासांचा स्टँडबाय टाईम मिळेल असा कंपनीचा दावा आहे. अन्य कनेक्टिव्हीटी ऑप्शन्समध्ये वायफाय, एलटीई, जीपीएस, ग्लोनास यांचा समावेश आहे.