भारतात बनलेली मर्सिडीज जीएलसी एसयूव्ही सादर

glc
लग्झरी कार निर्माती कंपनी मर्सिडीज बेंझ ने भारतात बनलेली नववी जीएलसी क्लास एसयूव्ही सादर केली आहे. जूनमध्ये या गाडीचे आयात मॉडेल भारतात सादर केले गेले होते त्यानंतर अवघ्या चार महिन्यांच्या काळात कंपनीने भारत निर्मित मॉडेल सादर करून रेकॉर्ड केले आहे.

हे मॉडेल पेट्रोल व डिझेल अशा दोन्ही व्हेरिंएंटमध्ये आहे. ही दोन्ही मॉडेल्स आयात मॉडेलच्या तुलनेत पाच लाख रूपयांपर्यंत स्वस्त आहेत. डिझेल मॉडेलच्या किंमती ४७.९ तर पेट्रोल मॉडेलच्या किमती ५१.९ लाखांपासून सुरू होत आहेत. कंपनीचे सीईओ रोलँड फोजर यांनी भारतात स्थानिक पातळीवर विकसित केलेले मॉडेल आयात मॉडेलनंतर अवघ्या चार महिन्यात बाजारात आणू शकल्याबद्दल आनंद व्यक्त केला असून या मॉडेल्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Leave a Comment