ऑक्टोबरमध्ये बँका ११ दिवस बंद!

bank
मुंबईः बँका ऑक्टोबर महिन्यात दसरा, दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर अकरा दिवस बंद राहणार असून बँकांना ऐन सणासुदीच्या काळात सुटट्या असल्यामुळे आर्थिक व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना आत्ताच नियोजनपूर्वक आर्थिक व्यवहार करावा लागणार आहे. ऑक्टोबरमधील पाच रविवार तसेच दुसरा आणि चौथा शनिवार या दिवशीही बँका बंद राहणार आहेत. दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदी करणाऱ्यांनी आत्ताच आर्थिक नियोजन करणे बंद आहे.

कशा आहेत बँकांना सुट्ट्या – २ ऑक्टोबरला (महात्मा गांधी जयंती), ८ ऑक्टोबरला दुसरा शनिवार, ९ ऑक्टोबरला रविवार, ११ तारखेला दसऱ्याची तर १२ ऑक्टोबर रोजी मोहरमची सुट्टी आणि ३० ऑक्टोबरला (लक्ष्मीपूजन) आणि ३१ ऑक्टोबरला बलिप्रतिपदाची सुट्टी आहे.

Leave a Comment