नवी दिल्ली – २ ते ६ ऑक्टोबरदरम्यान फ्लिपकार्टने आयोजित केलेल्या बिग बिलियन डेज् सेलदरम्यान मिंत्राच्या प्रतिदिनी विक्रीमध्ये पाचपट वाढ होण्याची शक्यता असून कंपनीला या दरम्यान २ ते २.५ लाख नवीन ग्राहक मिळतील अशी अपेक्षा असून मिंत्राची फ्लिपकार्ट ही पालक कंपनी आहे.
२.५ लाख नवीन गाहक जोडणार मिंत्रा
दुस-या वर्षी बिग बिलियन डेज्मध्ये मिंत्रा सहभागी होत असून कंपनीची यादरम्यान विक्री पाच पटीने वाढण्याची शक्यता आहे. यादरम्यान ग्राहकांना ७० टक्क्यांपर्यंत सूट देण्यात येईल. ग्राहकांसाठी २.५ लाख स्टाईल आणि डिझाईनमध्ये वस्तू दाखल करण्यात येतील असे मिंत्राचे सीईओ अनंत नारायण यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या बँडबरोबरच देशी ब्रॅन्डमध्ये मोठय़ा प्रमाणात या सेलदरम्यान सूट देण्यात येणार आहे. कंपनीने प्रत्येक दिनी दोन लाख डिलिव्हरी देण्याची सोय केली आहे. या सेलमध्ये जबाँग सहभागी होणार नाही. फ्लिपकार्टने मिंत्राला २०१४ मध्ये खरेदी केले आहे. या सेलदरम्यान १ अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची विक्री करण्याचा फ्लिपकार्टचा प्रयत्न आहे.