ब्लॅकबेरीची स्मार्टफोन निर्मिती बंद

black
ब्लॅकबेरीने त्यांच्या स्मार्टफोनची निर्मिती बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीत घट झाल्याने होत असलेले नुकसान थांबविण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीकडून स्पष्ट केले गेले आहे. आता ब्लॅकबेरी फक्त सॉफ्टवेअरवर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे कंपनीचे सीईओ जॉन शेन यांनी जाहीर केले.

शेन म्हणाले आम्ही आमच्या हार्डवेअर टीमला विक्रीचे टार्गेट ठरवून दिले होते मात्र ते साध्य हेाऊ शकलेले नाही. आता केवळ सॉफ्टवेअरवर लक्ष केंद्रीत करण्याचे नवे धोरण कंपनीने स्वीकारले आहे. यात सुरक्षा व अॅप्स यांचा समावेश असेल. त्याचे काम सुरूही झाले आहे. डीटीईके ५० स्मार्टफोनचे सॉफ्टवेअर ब्लॅकबेरीचे असले तरी हार्डवेअर टीएलसी ने डिझाईन केलेले आहे. २०१६ च्या दुसर्या तिमाहीत कंपनीला ३७२ दशलक्ष डॉलर्सचा महसूल मिळाला मात्र त्यापेक्षा नुकसान अधिक झाले असल्याचेही समजते.

Leave a Comment