१५०० कर्मचाऱयांना व्हीआरएस देणार हिंदुस्थान केबल्स

hindustan-cables
नवी दिल्ली – आजारी तसेच तोटय़ात असणा-या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या बंद करण्याच्या प्रयत्नात केंद्र सरकार असून अशा कंपन्यांपैकी एक असणा-या हिंदुस्थान केबल्स या कंपनीला बंद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ४७७७ कोटी रुपये किंमत असणारी कंपनी बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाला. या रकमेचा वापर कर्मचा-यांना व्हीआरएस आणि कर्ज फेडण्यासाठी करण्यात येणार आहे.

ही कंपनी गेल्या एका दशकापेक्षा जास्त कालावधीपासून आजारी होती. सध्या ही कंपनी ३१३९ कोटी रुपयांच्या तोटय़ात असून यासाठी सरकार एकूण १३०९ कोटी रुपये रोख रुपाने ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत कर्जाला इक्विटीमध्ये बदलण्यासाठी एकूण ३४६७ कोटी रुपये गुंतविणार आहे.

Leave a Comment