५००० रुपयांनी स्वस्त झाला लेईकोचा ‘ली मॅक्स २’

leeco
मुंबई : लेईको कंपनीने काही दिवसांपूर्वीच लाँच केलेल्या लेईको ली मॅक्स २ या स्मार्टफोनच्या किंमतीत तब्बल ५००० रुपयांची कपात केली आहे. आता हा ४ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी असलेला स्मार्टफोन भारतात १७,९९९ रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला तेव्हा याची किंमत २२९९९ रुपये इतकी होती. मात्र आता २ ते ६ ऑक्टोबरदरम्यान तुम्ही हा स्मार्टफोन १७९९९ रुपयांत खरेदी करु शकता.

Leave a Comment