बंगळुरुत धावणार सरकारच्या बाईक-टॅक्सी

bike-taxi
बंगळुरु – वाहतुककोंडीवर उपाय म्हणून कर्नाटक सरकारकडून शहरात बाईक-टॅक्सी सुविधा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला ही सुविधा रास्त दरात उपलब्ध असल्याने एकट्याने प्रवास करणाऱ्यांसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

एक मोबाईल अॅपदेखील या बाईक-टॅक्सीसाठी सुरू केले जाणार आहे. त्यामुळे या अॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बाईक-टॅक्सीचे बुकींग करता येईल. सुरुवातीच्या २ किमीपर्यंत ६ रुपये तर त्यापुढील प्रवासासाठी प्रत्येक किमीसाठी ५ रु. भाडे आकारण्यात येणार आहे. या बाईक-टॅक्सीची नंबर प्लेट पिवळ्या रंगामध्ये असणार आहे. बाईक कंपनीकडूनच प्रवाशाला हेल्मेट पुरवले जाईल. याआधी बंगळुरुमध्ये बाईक अँब्युलन्सची सुविधा देखली सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment