धर्मा प्रॉडक्शनसोबत अॅमेझॉनचा अनोखा करार

dharma
मुंबई – करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटांचा कॅटलॉग ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन बनवणार असून त्यानंतर अॅमेझॉन डिजीटल स्ट्रिमिंग सेवेच्या अंतर्गत हे चित्रपट सबस्क्रिप्शनवर उपलब्ध होतील.

धर्मा प्रॉडक्शनचे ‘ये दिल है मुश्किल’, ‘ओके जानू’ आणि ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ हे आगामी चित्रपट असून यापूर्वी प्रदर्शित झालेले सर्व चित्रपट या सेवे अंतर्गत उपलब्ध होतील. धर्मा प्रॉडक्शनचे चित्रपट सर्व थरातील प्रेक्षकांच्या पसंतीचे असतात. तरुणाईलाही या चित्रपटांची भुरळ पडलेली असते. त्यामुळे या प्रॉडक्शन हाऊससोबत करार झाल्याचे अॅमेझॉन व्हिडिओ इंडियाच्यावतीने सांगण्यात आले.

Leave a Comment