जागतिक ह्रदय दिन; महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक तणावाखाली असतात

heart-day
मुंबई – २९ सप्टेंबर रोजी दरवर्षी जागतिक हृदयदिन (वर्ल्ड हार्ट डे) म्हणून जगभर साजरा केला जातो. कुणालाही आणि कोणत्याही वयात हृदयविकार होऊ शकतो. त्यासाठी सर्वांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणात असे समोर आले आहे की, महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक तणावाखाली असतात. ८० टक्के पुरुष तर ७४ टक्के महिला तणावाखाली असल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले आहे. ‘वर्ल्ड हार्ट डे’ निमित्त आयसीआयसीआय लोम्बार्ड तर्फे हे सर्वेक्षण केले आहे.

नागरिकांना काही प्रश्न आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात विचारण्यात आले. अपु-या विश्रांतीमुळे ५२% तर कामाच्या तणावामुळे ५१% नागरिकांनी तणावामागचे कारण सांगितले आहे. ह्रदयरोगाच्या मागचे खरे कारण हे तणाव असल्याचे ७८% नागरिकांनी म्हटले आहे.

६७% नागरिकांना ह्रदयरोग आणि ५५% नागरिकांना हाय ब्लड प्रेशर असल्याचे सर्वेक्षणात समोर आले असुन यामागे देखील तणावच कारण असल्याचे समोर आल आहे. तर मोठ्या शहरांत न राहणा-या महिलांपैकी ७४ टक्के महिलांना तणावामुळे ह्रदयरोगासंदर्भातील आजार भेडसावत नसल्याचेही समोर आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment