अमेझॉनला चीत करण्यासाठी फ्लिपकार्ट वॉलमार्ट युती

walmart
ई कॉमर्स बाजारात वेगाने पुढे सरकत असलेल्या अमेझॉनला चीत करण्यासाठी भारतातील १ नंबरची ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट वॉलमार्टशी हातमिळवणी करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. वॉलमार्ट यासाठी १०० कोटी डॉलर्स म्हणजे ६७०० कोटी रूपयांची गुंतवणूक करत असल्याचेही सांगितले जात आहे. या दोन्ही कंपन्यात हातमिळविणी संदर्भातील चर्चा गंभीरपणे सुरू असल्याचे रिसर्च कंपनी सीबी इनसाईटसचे म्हणणे आहे.

सीबी इनसाईटसच्या म्हणण्यानुसार अमेझॉनने फ्लिपकार्ट व वॉलमार्ट या दोन्ही कंपन्यांसमोर चांगलेच आव्हान उभे केले आहे. फ्लिपकार्टचे मूल्यांकन सध्या १६०० कोटी डॉलर्स इतके आहे. या दोन्ही कंपन्यातील डील फायनल झाले तर त्याचा फायदा दोन्ही कंपन्यांना होणार आहे. देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी हा दर्जा कायम राखण्यासाठी फ्लिपकार्टला गुंतवणुकीची गरज आहे ती वॉलमार्ट पुरी करू शकते.तसेच वॉलमार्टला फ्लिपकार्टमुळे देशातील ई कॉमर्सची तयार बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment