रिलायन्स जियो सिम कार्डसाठी द्या एक युनिट रक्त!

jio
गाजियाबाद – आता स्वतंत्र भारतात रक्ताच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांना रोखण्यासाठी एका स्‍वयंसेवी संस्‍थेने तरुणांना आवाहन केले आहे. ‘तुम हमे खून दो; हम तुम्हे ‘जियो’ देंगे;’ असे आवाहन तरुणांना यावेळी करण्यात येत आहे. त्यानुसार रक्‍तदानाच्या बदल्यात त्यांना रिलायन्स जियो सिम कार्ड मोफत दिले जात आहे. या योजनेला तरुणांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

रक्‍तदान करण्यासाठी दिल्‍लीजवळ असणाऱ्या गाजियाबाद जिल्ह्यात तरुणांना प्रोत्‍साहित करण्यासाठी रोटरी क्‍लब संस्‍थेने रक्‍तदान शिबिराचे आयोजन केले आहे. शहराच्या नवयुग मार्केटमध्ये आयोजित या रक्‍तदान शिबिरात जियो सिम फ्री मिळविण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण रक्तदान करत आहेत.

रक्‍तदान शिबिराचे आयोजन करणाऱ्या संस्‍थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिबिरामध्ये रक्‍तदान करणाऱ्या व्यक्तीकडे आधार कार्ड, फोटो आणि ४G सपोर्ट स्मार्टफोन असणे आवश्‍यक आहे. संस्‍थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या शिबिराच्या माध्‍यमातून जमा रक्त ब्‍लड बँकेत पाठविले जाईल. तेथून गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जाईल.

Leave a Comment