अंबानी बंधूंची हातमिळवणी !

combo
मुंबई- मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओशी अनिल धीरूभाई अंबानी समुहाच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने हात मिळवणी केली असल्याची घोषणा अनिल अंबानी यांनी केली आहे. सर्व प्रात्यक्षिक कारणांसाठी रिलायन्स कम्युनिकेशन्स आणि रिलायन्स जिओनी करार केले असून आम्ही ‘वर्च्युयल मर्जर’ केले असल्याची घोषणा अनिल अंबानींनी वार्षिक आढावा बैठकीत केली.

दोन्ही भाऊ धीरूभाई अंबानींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र मिळून काम करणार असल्याचे अंबानी म्हणाले. २ जी, ३ जी, ४ जी सेवा देण्यासाठी आमच्याकडे आवश्यक ते स्पेक्ट्रम्स आहेत, आमचे टॉवर्स एक असणार आहेत, आमचा आवाज एक असणार आहे सर्व काही गोष्टी या प्रकल्पामध्ये एकच असणार असल्याचे अंबानी म्हणाले. गेल्या ९० दिवसांमध्ये आम्ही १० लाख ४ जी ग्राहक मिळवले असल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment