व्होडाफोन १ जीबीच्या प्लॅनमध्ये देणार ९ जीबी ४जी डेटा

vodafon
नवी दिल्ली – रिलायन्स जिओच्या मोफत सेवेला टक्कर देण्यासाठी व्होडाफोनने नवीन डेटा प्लॅन आणला असून ग्राहकांना यामध्ये एक जीबी डेटाच्या प्लॅनमध्ये १० जीबी ४ जी डेटा मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांकडे नवीन ४जी स्मार्टफोन असणे गरजेचे आहे.

व्होडाफोनकडे ३जी आणि ४जी सर्कलचा परवाना असणा-या या सर्कलमध्ये या ऑफर लागू करण्यात आली आहे. पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांना ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत या प्लॅनचा लाभ घेता येईल. जिओ आपल्या ग्राहकांना ४जी डेटा आणि मोफत व्हाईस कॉलची सेवा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत देणार आहे.

आपण ग्राहकांना ४जी स्मार्टफोनमध्ये अपग्रेड करण्याची संधी देत आहोत. ग्राहकांना नव्या ऑफरमुळे व्होडाफोन सुपरनेटचा लाभ ४जी स्मार्टफोनच्या सहाय्याने घेणे सहज सोपे होणार आहे, असे व्होडाफोन इंडियाचे संचालक संदीय कटारिया यांनी सांगितले. या ऑफरनुसार ग्राहकांना व्होडाफोन प्लेमधील टीव्ही, चित्रपट आणि संगीताचा मोफत लाभ घेता येईल. गेल्या सहा महिन्यांपासून 4जीचा लाभ ज्या स्मार्टफोनने घेतला नाही, त्यांच्याच साठी ही ऑफर आहे.

Leave a Comment