वायू प्रदुषणामुळे भारतातील ७५ टक्के मृत्यू : जागतिक आरोग्य संघटना

who
मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालामुळे ‘इस शहर को ये हुआ क्या, कहीं राख है तो कहीं धुंवा-धुंवा…’ अशी चित्रपटाच्या सुरुवातीला लागणारी ही जाहिरातीतील वाक्य आता हवा प्रदूषणासाठी वापरावीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतात जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१२च्या आकडेवारीनुसार वायू प्रदुषणामुळे वर्षभरात ६ लाख २१ हजार १३८लोकांचा मृत्यू होतो. भारतात होणाऱ्या एकूण मृत्यूंपैकी ७५ टक्के मृत्यू वायू प्रदुषणाशी संबंधित असतात. बहुतांश लोकांना श्वसनाचे विकार, हृदयरोग, तसेच फुफ्फुसाशी संबंधित आजार झाले आहेत.

भारतात हृदयरोगामुळे २०१२च्या आकडेवारीनुसार २ लाख ४९ हजार ३८८ जणांचे मृत्यू होतात. जगभरात प्रत्येक १० पैकी ९ जण घातक हवेचे श्वसन करत आहेत. वायू प्रदुषणामुळे होणारे ९० टक्के मृत्यू हे मध्य आणि अल्प उत्पन्न गटातील देशांमध्ये आहेत. अर्थात प्रत्येक गोष्टीला असतात तसे या समस्येपासून सोडवणूक करण्यासाठी देखील उपाय आहेत.

आजच्या घडीला तंत्रज्ञान विकसित होत आहे, तर नवनवे शोध लागत आहेत. त्याद्वारे मानवी जीवनही सुलभ होत आहे. मात्र असे असले तरी माणसाचे सरासरी आयुष्यमान कमी होत चालले आहे. विकासाच्या आडून येत असलेला प्रदूषणरुपी राक्षस त्यास जबाबदार आहे. त्याला वेळीच गाडले नाही, तर मानवाचा विनाश अटळ आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment