‘लाव्हा’च्या स्मार्टफोनची हफ्त्यात करा परतफेड

lava
मुंबई : ‘लाव्हा’ कंपनीने आपल्या स्मार्टफोनवर समान हफ्त्यात परतफेड करणारी ‘ईएमआय’ योजना आगामी सणाच्या मुहूर्तावर आणली आहे. ‘हे स्मार्टफोन खरेदी करण्याची खास ऑफर होम क्रेडिट इंडिया’ या ग्राहक स्थिर कर्ज पुरविणा-या कंपनीच्या सहकार्याने शून्य टक्के व्याजदराने दिली आहे.

महाराष्ट्रात ही ऑफर १६ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर सुरू राहील. या ऑफरअंतर्गत महाराष्ट्रातील काही निवडक दुकानांमध्ये लाव्हा स्मार्टफोन विकत घेता येईल. त्यासाठी डाऊन पेमेंट स्वरुपात काही ठराविक रक्कम प्रक्रिया शुल्क भरून शून्य टक्के व्याजदर योजनेचा लाभ ग्राहकांना घेता येईल. या कर्जाबाबतचे सर्व व्यवहार होम पेडिट सर्व व्यवहार, होम पेडिट कंपनीद्वारेच केले जातील. या योजनाचा अधिक माहितीसाठी तसेच अटीकरिता ग्राहकांनी bit.ly/LavaEMI या वेबसाईटला भेट द्यावी.

लाव्हाने याशिवाय देशभरासाठी आणखी एक ऑफर सुरू केली आहे. यामध्ये देशभरातील ग्राहकांना एकमेव मोबाईल स्क्रीन बदलून मिळेल. १५ सप्टेंबर २०१६ ते १५ नोव्हेंबर २०१६ या काळात खरेदी केलेल्या लाव्हाच्या प्रत्येक आगामी फोन अथवा स्मार्टफोनवर ही ऑफर उपलब्ध असेल. या ऑफर काळात खरेदी केलेल्या मोबाईलची स्क्रीन ३६५ दिवसात तुटल्यास या ऑफरमध्ये ती बदलून दिली जाईल.

Leave a Comment