महिना बाराशे कमाविणारा करोडपती!

salesman
भोपाळ: मध्यप्रदेशमध्ये सेल्समनची नोकरी करून दरमहा १ हजार २०० रुपये कमावणारा प्रत्यक्षात करोडपती असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. लोकायुक्त कार्यालयाच्या कारवाईमध्ये ही माहिती उघडकीला आली आहे.

या कोट्यधीश सेल्समनचे नाव सुरेश प्रसाद पांडे असून तो सिद्धी जिल्ह्यातील रहिवासी आहे. लोकायुक्त कार्यालयाने त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यामध्ये त्याच्याकडे कोट्यवधींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. यामध्ये सोन्याचे दागिने, चार वाहने याचा समावेश असून पांडे याच्याकडे एक पिस्तुलही आहे. पांडेची एकूण आठ बँकांमध्ये खाती असून त्याच्या पत्नी व मुलांच्या नावेही खाती आहेत.

बेहिशेबी मालमत्तेबाबत आलेल्या तक्रारींनुसार लोकायुक्त कार्यालयाचे अधिकारी सुरेंद्र सिंह आणि देवेश पाठक यांनी केलेल्या कारवाईत सेल्समन सुरेश पांडे याच्याकडे त्याच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा २०० पट अधिक संपत्ती असल्याचे दिसून आले आहे.

Leave a Comment