तीन डीएनएच्या संयोगातून जन्मले जगातले पहिले बाळ

dna
जगातले पहिले बाळ तीन व्यक्तींच्या डीएनए संयोगातून जन्मास घालण्यास अमेरिकी डॉक्टरांना यश मिळाले आहे. या बाळात दोन महिला व १ पुरूष यांच्यातील डिएनए आहेत. पाच महिन्यांचा हा मुलगा आई वडील तसेच दानकर्त्याचा अनुवंशिक डीएनए घेऊन जन्मास आला आहे.

या बाळाला जन्म देणारी महिला जॉर्डनची असून हा प्रयोग मेक्सिकोत केला गेला कारण अशा प्रयोगांना अमेरिकेत बंदी आहे. मिळालेल्या माहितीनुसार या महिलेच्या डीएनएत मायटोकाँड्रीया हा दोष होता. या महिलेचे पूर्वी पाच गर्भपात झाले आहेत व दोन मुले जन्मताच मरण पावली आहेत. डीएनएतील या दोषामुळे जन्मणार्‍या बालकाच्या मेंदूत दोष येतो व त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आज जगातील ४० हजार बालकांमागे १ असे या दोषाचे प्रमाण आहे.

डॉक्टरांनी केलेल्या प्रयोगात या महिलेच्या मायटोकाँड्रीया पेशी तून केंद्र वेगळे केले गेले व दाता महिलेच्या मायटोकाँड्रीया पेशीतून वेगळे केलेले केंद्र यात ट्रान्सप्लाँट केले गेले. त्यामुळे आई वडील व दाता महिला असे तीन डीएनएतून या मुलाचा जन्म झाला असून तो आनुवंशिक दोषापासून मुक्त झाला आहे. या प्रयोगामुळे अनुवंशिक दोष घेऊन जन्मास येणार्‍या मुलांसाठी क्रांती घडेल व दुर्लभ दोषांपासून मुक्ती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment