तरूणांनो चला लष्करी पर्यटनाला

sima
पुणे -महाराष्ट्र आर्मी वेलफेअर विभागाने लष्करी पर्यटनाचा पहिला वहिला प्रयोग सुरू केला असून देशातला या प्रकारचा हा पहिलाच प्रयोग ठरला आहे. युवकांना लष्कराचे आकर्षण निर्माण व्हावे हा यामागच्या मुख्य उद्देश आहे. तसेच या मुळे माजी सैनिकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.

या पर्यटनात पर्यटकांना लष्करी जवानांचे रोजचे जीवन, जम्मू काश्मीर, चीन, पाकिस्तान, बांग्लादेश व म्यानमार सीमा क्षेत्राची सुरक्षा कशी राखले जाते हे पाहण्याची संधी मिळणार आहे. या संदर्भात माहिती देताना कर्नल सुहास नाईक म्हणाले, या पर्यटनात पर्यटकांना लष्कराची प्रशिक्षण केंद्रे, संग्रहालये, सेना मुख्यालये तसेच सीमा भागातील कामकाज यांची माहिती दिली जाईल. त्यासाठी वेगवेगळी पॅकेज तयार करण्यात आली असून बुकींगला मोठा प्रतिसाद मिळतो आहे.

यात ७ वी तील विद्यार्थ्यांसाठी ३ दिवस, ८ वी ते १० साठी ४ दिवस, कॉलेज विद्यार्थ्यांसाठी सात दिवस तर कार्पोरेट साठी १० दिवस अशा मुदतीचे प्रवास आहेत. त्यात राहणे, जेवणखाण व प्रवास अतिशय अल्प दरात करता येणार आहे. महाड व अलिबाग येथे आर्मी वेलफेयर गेस्टहाऊस आहेत. इच्छुकांनी त्यांना किती दिवसांसाठी व कोणत्या राज्यात लष्करी पर्यटन हवे याची नोंदणी ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष करायची आहे. ५ आक्टोबरला पहिली ट्रीप रवाना होत असून त्यासाठी पुण्यातील ५०० कॉलेज युवकांनी बुकींग केले आहे. तसेच डिसेंबरसाठीचे बुकींगही फुल झाले आहे.

Leave a Comment