डिसेंबरपासून काढा ‘पीएफ’चे ऑनलाईन पैसे

epfo
नवी दिल्ली- सातत्याने नोकरी बदलण्याच्या युगात नोकरी सोडल्यानंतर अनेकांना आपला ‘पीएफ’ काढणे अडचणीचे वाटत असते. आता मात्र तुम्ही आरामात घरबसल्या तुमचे पीएफचे पैसे काढू शकणार आहात.

डिसेंबर महिन्यापासून खासगी कंपनीत काम करणारे कर्मचारी पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकणार आहेत. सध्या ईपीएफओ त्यासाठी डेटा इंटिग्रेशनवर काम करीत आहे. यासाठी संगणक प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी त्यांचे पीएफचे पैसे ऑनलाईन काढू शकतील. सध्या वैश्विक खाते क्रमांक असलेल्या ३.६ कोटी वापरकर्त्यांना याचा लाभ होऊ शकणार आहे.

Leave a Comment