चक्क मोफत मिळणार ‘Freedom 251’

ringing-bells
नवी दिल्ली – एकदा पुन्हा अवघ्या २५१ रुपयांत स्मार्टफोन देणारी कंपनी रिंगिंग बेल्स चर्चेत आली असून आपला पहिला वर्धापन दिन कंपनी साजरा करत आहे. यानिमित्ताने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी तीन स्पेशल आणि आकर्षक ऑफर दिल्या आहेत.

ग्राहकांना आता हायटेक फीचर्सने अद्ययावत ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन चक्क मोफत देणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. दरम्यान, गेल्या वर्षी रिंगिंग बेल्सने केवळ २५१ रुपयांत स्मार्टफोन देण्याची घोषणा केली होती. गॅजेट मार्केटमध्ये या फोनची जोरदार चर्चाही झाली होती.

३ नव्या स्कीम रिंगिंग बेल्सने प्रथम वर्धापन दिनाला लॉन्च केल्या आहेत. तिनही स्कीम कंपनीच्या लॉयल्टी प्रोग्रामशी संबंधित आहेत. यासाठी ग्राहकाला कंपनीचा एखादा लॉयल्टी प्रोग्राम घ्यावा लागेल. याचा अर्थ असा की, कंपनीच्या तीन पैकी एका प्लानची मेंबरशिप घ्यावी लागेल. मेंबरशिप मिळाल्यानंतर ग्राहकाला मोफत ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोनसह अनेक लाभ मिळतील. यामध्ये ग्राहकांना एक वर्षासाठी मेंबरशिप मिळेल. त्यात त्यांना ‘फ्रीडम २५१’ स्मार्टफोन मोफत देण्यात येईल. त्याचप्रमाणे RBPL (Ringing Bells Pvt. Ltd.) प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट मिळेल.

Leave a Comment