काचेच्या पुलावर नो ‘हाय हिल्स’

bridge
आता पर्यटकांसाठी पुन्हा एकदा जवळपास १० विश्वविक्रम नावावर असलेला चीनमधला आणि जगातला पहिला वहिला काचेचा पूल खुला करण्यात आला असून या पूलाचे गेल्याच महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते. मात्र दोन आठवड्यातच हा पूल बंद करण्याची वेळ पूल बांधणा-या कंपनीवर आली होती. हा विश्वविक्रमी काचेचा पूल पाहण्यासाठी दरदिवशी हजारो संख्येने पर्यटक येथे येत होते. वास्तविक पाहता फक्त ८ हजार पर्यटकांचे वजन पेलू शकेल इतकी क्षमता या पूलाची होती. मात्र दरदिवशी कुतूहल म्हणून किंवा या पुलावर चालण्याचा थरार अनुभवण्यासाठी जवळपास १० हजार पर्यटक या पुलाला भेट देण्यासाठी येऊ लागले त्यामुळे कोणताही अपघात होऊ नये यासाठी आणि पर्यटकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यासाठी तो बंद करण्यात आला होता.

आता हा पूल पुन्हा ऑक्टोबर पासून सुरू करण्याची घोषणा कंपनीने केली असून पण तो सुरु करताना पर्यटकांवर काही बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार महिला पर्यटकांना या पुलावर हाय हिल्स घालण्यात बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे फोन आणि पैशाचे पाकिट याव्यतिरिक्त कोणत्याही वस्तू येथे नेण्यात पूर्णपणे मज्जाव करण्यात आला आहे. तसेच पूल ओलांडताना रेलिंगन्साना हात न लावता तो ओलांडण्याची सूचना देखील करण्यात आली आहे.

Leave a Comment