४ ऑक्टोबरला लॉन्च होणार बहुप्रतिक्षित ‘मोटो झेड’

moto-z
मुंबई : भारतीय बाजारपेठेत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात इलेक्ट्रॉनिक कंपनी मोटोरोला बहुप्रतिक्षीत मोटो झेड लॉन्च करणार असून ही माहिती मोटोरोलाच्या ट्विटर हँडलवरुन देण्यात आली.

जून २०१६ मध्येच मोटोरोलाचा मोटो झेड जागतिक बाजारात आला आहे. या फोनसोबत मॉड्स नावाची एक्सेसरीजही देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मोबाईल वापरण्याचा अनुभव सुलभ होतो. या स्मार्टफोनची किंमत जवळपास २० हजार रुपये असेल, तर मॉड्ससाठी ग्राहकांना ३३०० रुपये द्यावे लागतील.

मोटोरोला उत्सवांच्या काळात ८ नवीन उत्पादणे भारतीय बाजारपेठेत उतरवणार आहे. त्यात मोटो झेडचाही समावेश असल्याचे लेनोवोचे भारताचे कार्यकारी संचालक सुधीन माथुर यांनी सांगितले आहे. मोटो झेड सध्या अमेरिका, ब्रिटन आणि लॅटिन अमेरिकेत उपलब्ध आहे. यात मोटो झेड, मोटो झेड प्ले, आणि मोटो झेड फोर्स या मॉडेल्सचा समावेश आहे. भारतात हा फोन फ्लिपकार्टवर उपलब्ध असेल. तसंच रिलायन्स जीओ ऑफरचा लाभही ग्राहकांना घेता येईल.

Leave a Comment