ग्रे मार्केटमध्ये १ आक्टोबरलाच येणार आयफोन ७

smuggle
दिल्ली – भारतात अॅपलचा नवा आयफोन सेव्हन व प्लस ८ आक्टोबरला अधिकृत रित्या दाखल होणार असला तरी दिल्लीच्या ग्रे मार्केटमध्ये हा फोन १ आक्टोबरलाच लाँच करण्याची जोरदार तयारी केली गेली आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे फोन तस्करी करून भारतात आणले गेले आहेत व दिल्ली व मुंबईतील काळ्या बाजारात त्यांना चांगलीच मागणी आहे. दिल्ली एअरपोर्टवर कस्टम अधिकार्‍यांनी अलिकडेच तीन लोकांना हे फोन चोरून आणताना पकडून त्यांच्याकडून आयफोन जप्तही केले आहेत. हे फोन प्रामुख्याने हाँगकाँगमधून स्मगल केले जात आहेत.

काळ्या बाजारात हे फोन दाखल झाले असले तरी १ आक्टोबरला नवरात्राची सुरवात होत असल्याने त्या दिवसापासूनच ते विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार असल्याचे समजते. सध्या पक्षपंधरवडा सुरू असल्याचे लोक नवीन फोन घेण्यास फारसे उत्सुक नाहीत मात्र फोनची मागणी त्यांनी नोंदविली आहे. एका आयफोन विक्रीमागे २० ते ३० हजार रूपयांचा फायदा मिळतो व दिल्लीत असा एक खास वर्ग आहे, जो महागातील महाग वस्तू सर्वप्रथम खरेदी करण्यास प्राधान्य देणारा आहे. आयफोनची मागणी करणार्‍यांत या लोकाचा भरणा अधिक आहे असेही समजते. कस्टम विभागाने इंदिरा गांधी विमानतळाच्या टी थ्री टर्मिनसवर आयफोन तस्करांसाठी जाळे विणले असल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment