स्वस्त झाली ‘ओला’ची ‘शेअर’ सेवा

ola
मुंबई – आपल्या ‘शेअर’ सेवेच्या दरात ४५ टक्क्यांनी अॅप आधारित टॅक्सी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या ओलाने कपात केली असून ओलाने आपली सेवा आता इतर ३ शहरांमध्ये सुरु करणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही दर कपात आपल्या शेअर सेवेत सात शहरांसाठी लागू करण्यात आली आहे. यात मुंबई आणि बंगळुरु या शहरांसह दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता आणि पुणे या शहरांचाही समावेश आहे. या सातही शहरांमध्ये ग्राहकांकडून ३ रुपये प्रतिकिलोमीटर दरानेच भाडे आकारले जाणार आहे.

विशेष म्हणजे, आपला विस्तार करण्याच्या दृष्टीने कंपनीने ओलाची ही सेवा इतर तीन शहरांमध्ये लकरच करणार आहे. यात चंदीगढ, जयपूर आणि अहमदाबाद या शहरांचा समावेश आहे. ओलाच्या या विस्तारामुळे देशातील १० शहरात ही सेवा उपलब्ध झाली आहे. तसेच या ७ शहरांमध्ये कंपनीने दर घटवले आहेत. प्रति किमीला जवळ जवळ ३ रुपये कमी करण्यात आले आहेत. सर्वात जास्त कपात मुंबई आणि बंगळुरूमध्ये करण्यात आली आहे. तसेच या सेवा चंदीगढ, जयपुर आणि अहमदाबादमध्ये कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे कमी केलेले दर या तिन्ही शहरांमध्ये लागू झाले आहेत. ओला कंपनीची प्रतिस्पर्शी अमेरिकन कंपनी उबेरपण अशीच सेवा देत आहे. उबेर पूल अंतर्गत ही सेवा देऊन ग्राहकांना मॅसेज पाठवले जात आहेत.