सर्च इंजिन गुगल सज्ञान झाले

goolle
सर्च इंजिन गुगलने २७ सप्टेंबरला आपला १८ वा वाढदिवस साजरा करताना खास अॅनिमेटेड डुडल सादर केले आहे. गुगलला १८ वर्ष झाली म्हणजे भारतीय कायद्यानुसार गुगल सज्ञान झाले असे म्हणता येईल. अर्थात गुगलने चार वेगवेगळ्या तारखांना त्यांचा वाढदिवस आत्तापर्यंत साजरा केला आहे व १५ व्या वाढदिवशी त्यांचा वर्धापन दिन नक्की कोणता हे माहित नसल्याची कबुलीही दिली होती.

आत्तापर्यंत या १८ वर्षांच्या कारकीर्दीत गुगलने ७, ८, २६ य २७ सप्टेंबर अशा चार तारखांना त्यांचा वर्धापनदिन साजरा केला आहे. २७ सप्टेंबरला त्यांचा चौथा वर्धापनदिन साजरा केला गेला होता त्यानंतर तो ७ व ८ तारखेला केला गेला. २००६ पासून मात्र २७ सप्टेंबरलाच तो साजरा केला जात आहे. गुगल डॉट काॅमचे डोमेन १५ सप्टेंबर १९९५ रोजी रजिस्टर केले गेले होते त्यामुळे हा दिवसही त्यांचा वर्धापनदिन ठरू शकतो.

गुगलचे संस्थापक लॅरी पेज व सर्जी बिन यांनी ४ सप्टेंबर १९९८ रोजी कंपनी रजिस्टर केली होती व याच दिवशी कंपनीचे पहिले बँक अकौंट उघडले गेले. ३० ऑगस्ट रोजी कंपनीने पहिले डुडल सादर केले होते.

Leave a Comment