रेल्वे कर्मचा-यांना मिळू शकतो ७८ दिवसांचा बोनस

railway
नवी दिल्ली – रेल्वेच्या कर्मचा-यांना लवकरच येणा-या सणासुदींच्या कालावधीसाठी या वर्षातील ७८ दिवसांचा बोनस मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आर्थिक संकटात असूनही रेल्वे मंत्रालय ७८ दिवसांचा बोनस देण्याची तयारी करत आहे. रेल्वे कर्मचा-यांना गेल्या चार वर्षांपासून ७८ दिवसांचा बोनस देण्यात येत आहे.

यावर्षी सर्व रेल्वे कर्मचा-यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे. सरकार यासंबंधीची अधिकृत घोषणा पुढील आठवडय़ात करेल असे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन रेल्वेमेनचे सरचिटणीस एम. राघवैया यांनी सांगितले. विजयादशमीपूर्वी देशातील १२ लाख रेल्वे कर्मचा-यांनी प्रत्येक वर्षाच्या उत्पादकतेनुसार बोनस देण्यात येत आहे.

७८ दिवसांचा बोनस म्हणजेच प्रत्येक कर्मचा-याला १८ हजार रुपये बोनसच्या रुपाने मिळतील. ७८ दिवसांच्या बोनस प्रस्तावावर पुढील आठवडय़ात होणा-या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. बोनसच्या या घोषणेने रेल्वे मंत्रालयावर साधारण २ हजार कोटी रुपयांचे ओझे पडण्याची शक्यता आहे. मालवाहतुकीत घसरण आणि कमी अंतराच्या रेल्वे प्रवाशांच्या संख्येत घसरण आल्याने प्रतिवर्षी १० हजार कोटी रुपयांच्या तोटय़ाचा सामना करावा लागत आहे.

Leave a Comment