यंदाच्या नवरात्रीत अनेक शुभयोग

jogesh
येत्या १ आक्टोबरपासून देशभरात नवरात्राची धामधूम सुरू होत आहे. यंदाचे नवरात्र दहा दिवसांचे आहे व १६ वर्षानंतर यंदा शारदिय नवरात्र गजकेशरी महासंयोगावर आले आहे. यंदा द्वितीया दोन दिवस असल्याने नवरात्र १० दिवसांचे असल्याचे पंचागांत नमूद केले गेले आहे.

या नवरात्रात देवीचे आगमन घोड्यावरून होणार आहे तर प्रस्थान रेड्यावरून होणार आहे. हा अतिशुभ योग असल्याचे सांगितले जाते.गुरू व चंद्र हे दोन्ही ग्रह कन्याराशीत एकाचवेळी असताना हा योग असतो. देवीच्या नऊ रूपांची आराधना नवरात्रात केली जाते. देवी पुराणात देवाच्या आगमन व प्रस्थानासाठी वारानुसार वाहने ठरविली गेली आहेत.

यानुसार रविवार व सोमवारी नवरात्राची स्थापना होत असेल तर हत्ती वाहन असते. शनिवार मंगळवार असेल तर घोडा, गुरूवार शुक्रवार असेल तर पालखी व बुधवार असेल तर नौका वाहन असते. या उलट देवीचे प्रस्थान रविवार सोमवार असल्यास रेड्यावरून, शनिवार मंगळवार असल्यास सिंहावरून, बुधवार शुक्रवार असल्यास हत्तीवरून तर गुरूवार असल्यास नरावरून होते असा समज आहे.

Leave a Comment