निवृत्तीआधीच बँक ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्षांची हकालपट्टी

shushil-muhnot
नवी दिल्ली : बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सुशील मुहनोत यांची हकालपट्टी करण्यात आली असून केंद्र सरकारने ही कारवाई अधिकारांचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवून केली आहे. त्यांच्या निवृत्तीला चार दिवस बाकी असताना ही कारवाई करण्यात करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१३मध्ये मुहनोत यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. अध्यक्ष असताना त्यांनी पुण्यातील बंगल्याच्या नुतनीकरणासाठी मंजूर खर्चापेक्षा अधिक खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. तसेच बँकेच्या अधिकारातील मुंबईतील एक निवासस्थानही ताब्यात ठेवले होते. अर्थमंत्रालयाणे नुकतीच त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुहनोत यांच्या जागी आता रवींद्र मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment